चिपळूणच्या महेक अडरेकरला BPT पदवी, आता डॉ. महेक!

चिपळूण : तालुक्यातील खडपोली गावातील माजी सरपंच मुस्कान अडरेकर आणि मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष तसेच चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांची कन्या महेक अडरेकर हिने कर्नाटक येथील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT) ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे महेकला आता “डॉ.” हा गौरवपूर्ण उपसर्ग प्राप्त झाला आहे.

महेकने तिच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात सातत्याने प्रथम श्रेणी मिळवली आहे. तिच्या यशामागे तिचा आत्मविश्वास, ध्येयनिष्ठा, कठोर परिश्रम, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. तिचे हे यश केवळ अडरेकर कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चिपळूण तालुका आणि मुस्लिम समाजासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करताना डॉ. महेकने आपले ज्ञान आणि कौशल्य समाजाच्या कल्याणासाठी वापरण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. तिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, तिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*