रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली.

पुणे येथे असलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देवेंदर सिंह कार्यरत होते. तर मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची . मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याने बदलून जात आहेत.

पुणे येथे संचालक पदापूर्वी त्यांनी आधी अकोला आणि चंद्रपूर येथे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर यवतमाळ व बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील 2011 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे बँकिंग क्षेत्रात सेवा बजावलेली आहे.

5 वर्षांच्या या खाजगी क्षेत्रातील बँक सेवा कालावधीत रिझर्व बँक ऑफ इंडियाशी त्यांच्या कामाचा निकटचा संबंध होता.

देवेंदर सिंह यांनी आयआयटी रडकी येथून संगणक अभियांत्रिकी व नंतर एम.बी.ए केलेले आहे.

आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी सदीच्छा भेटीसाठी आलेल्या पत्रकारांशीही संवाद साधला.