दापोली :- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या विक्रमी पावसानंतर मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला आहे. चिपळुण मधील पुरस्थिती पुर्वपदावर येत असताना येथील बहाद्दूर शेख पूल तुटल्यामुळे आणि परशुरामघाटही बंद असल्याने चिपळूण येथे दापोली,मंडणगड, खेड तालुक्यातून मदतीकरिता चिपळूण येथे जाण्याकरीता दाभोळ-गुहागर मार्ग चिपळुण एकमेव मार्ग आहे. यामुळे आता या मार्गावर गाड्यांची गर्दी वाढली आहे. यामार्गे जाणेकरीता दाभोळ-धोपावे ही एकमेव जेटी आहे. या जेटीवर आज सकाळ पासून लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्या आहेत. यामुळे मदत नेणाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. या मार्गावर वहातूक वाढल्यामुळे दाभोळ -धोपावे मार्गावर गर्दिच्या वेळी दोन जेटी सुरू करण्याची मागणी आता डाॅ.मोकल यांच्याकडे जनतेतर्फे करण्यात येत आहे.