जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

हजार खालील लोकसंख्या असलेल्या गावात दुकाने सुरु ठेवण्याची सवलत

रत्नागिरी दि. 08 (जिमाका) :ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हयात लागू लॉकडाऊन 15 जुलै 2020 पर्यंत जारी ठेवण्याचे आदेश अंशत: शिथिलता देऊन कायम ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले.
यानुसार परिशिष्ठ ब मध्ये 5 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावातील सर्व दुकाने सुरु ठेवता येईल, अशी सवलत देण्यात आली आहे. तथापि या दुकानात 60 वर्षांपुढील व्यक्ती तसेच 10 वर्षांखालील मुले यांना सामान खरेदी करता येणार नाही. एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला खरेदीची मुभा असेल.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेल्या निर्बंधांना पंधरा जुलै 2020 पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.