रत्नागिरी : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्हा ३ स्तरात सामावेश झाला आहे. जिल्ह्याला निर्बंधतातून शिथिलता देण्यास तत्वतः मान्यता मिळाली असून बुधवारी (ता. २३) यावर निर्णय होईल. कशात किती सवलत दिली जाईल हे जिल्हाधिकारी जाहीर करतील, अशी दिलासादायक माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदते ते बोलत होते. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते.

ते म्हणाले, तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पहिल्या लाटेत ६० वर्षांवरील, दुसऱ्या लाटेत तरुण तर तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरीत १७३ बेडची लहान मुलांची तीन कोविड संटेर तयार करण्यात आली आहेत. लहान मुलांच्या करमनुकीची, शिक्षणाची सर्व व्यवस्था त्यामध्ये आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून लाखो रुपये खर्च केले आहेत. आमची परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे की, या कोविड सेंटरचा उपयोग नाही झाला तरी चालेल. आमचा निधी फुकट जाऊ दे पण तिसरी लाट येऊच नये.

https://mykokan.in