वाटद MIDC साठी आज पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणी; ग्रामस्थांचा विरोध कायम

रत्नागिरी: वाटद येथील प्रस्तावित MIDC साठी जमीन मोजणीचा आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

प्रशासन आजपासूनच पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मोजणीला सुरुवात करणार आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या मोजणीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता, परंतु आज प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

सुमारे ९०० एकर जमिनीवर संरक्षण मंत्रालयाचा शस्त्र निर्मितीचा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मात्र, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

आठवडाभरापूर्वी भूमिअभिलेख, MIDC आणि उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने मोजणीचा प्रयत्न केला होता, मात्र ग्रामस्थांनी जोरदार विरोध केल्याने मोजणी होऊ शकली नव्हती.

यावेळी प्रशासनाने वेळेत नोटीस न दिल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला होता.

दरम्यान, प्रशासनाने आजच्या मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

जमीन मोजणीला ग्रामस्थांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने तणावाचे वातावरण आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*