साखलोली शिवाजीनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वार जखमी

सख्लोली शिवाजीनगर रस्त्यावर बिबट्याने १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून प्रवास करणारे ऋषभ दाभोळकर राहणार असोंड व अमर लांजेकर राहणार शिवाजीनगर यांच्यावर पाठलाग करत हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले असुन तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच वनआधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

गेली अनेक महिन्यांपासून या बिबट्याची दहशत सख्लोली या मार्गावर असून या आधीही या बिबट्याने माणसांवर हल्ला करून जखमी केले आहे. वनविभागाचे अधिकारी या बिबट्याचा बंदोबस्त करणार की त्याच्या हल्ल्यात माणसांचा जीव गमविण्याची वाट पहाणार असा प्रश्न वाहनचलकांसहित प्रवासी वर्गाला पडला आहे.

बिबट्याची दहशत निर्माण झाल्यापासून या मार्गावर वाहनचालक जाण्यास धजावत नाहीत. आणि जर गेलेच तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वनविभागाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*