मुंबई: कोकणात मोठय़ा प्रमाणात एलईडीचा वापर करून बेकायदा मासेमारी सुरू असल्यामुळे काही वर्षांनी मत्स्यदुष्काळ निर्माण होऊ शकतो. यामागे ट्रॉलर्स कंपन्या आणि मंत्रालयातील काही जणांचे साटेलोटे आहे. याला आळा घालण्यासाठी एलईडी मासेमारीविरोधात कायदा करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेत करण्यात आली. विधान परिषदेत गुरुवारी पुरवण्या मागण्यांवेळी कोकणातील एलईडी मासेमारीचा विषय माजी पर्यावरण मंत्री आ. रामदास कदम यांनी मांडला.