देशाची गान कोकीळा लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या.
यादरम्यान त्यांना अनेकदा जनरल वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. नुकतेच त्यांना आयसीयूमधून हलवण्यात आले होते, मात्र आज सकाळपासून त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले.
लता मंगेशकर कोरोनाची लागण झाल्याने आणि न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे प्रतीत समधानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होती आणि त्यांच्या उपचारात सतत गुंतलेली होती.