रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन , वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली जिल्हा अजिंक्य पदाच्या कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. १९ / ०२ / २०२१ रोजी सकाळी १० वाजता श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था मंदिर सभा मंडपामध्ये जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
सदर कुस्ती स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील कुस्तीगिरांना भाग घेता येईल. यासाठी जन्मतारखेचा दाखला म्हणून आधार कार्ड, नगर परिषद, ग्रामपंचायत किंवा शाळा व महाविद्यालय यांचा मुळ प्रति मधील जन्म दाखला आणणे गरजेचे आहे.
खेळाडूंनी रेशनकार्डाची मुळप्रत आणणे आवश्यक आहे. वास्तव्याबाबत शंका किंवा तक्रार झाल्यास तसेच खेळासंबंधी कोणतीही तक्रार झाल्यास असोसिएशनचा निर्णय अंतिम राहिल. प्रवेश फी वरिष्ठ गट पुरुष, गादी- माती , ग्रिकोरोमन गट २०० रु. व प्रौढ गट महिला, कुमार गट मुले, मुली १०० रु. अशी आहे.
तरी कुस्तीगिरांनी खेळण्याच्या गणवेशासह शुक्रवार दि. १९ / ०२ / २०२१ रोजी सकाळी १० वाजता हजर रहावे. जिल्हा स्पर्धेसाठी स्वखर्चाने जाणे- येणेचे आहे. वरील कुस्ती स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कुस्तीगीरांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल याबाबत सर्व अधिकारी असोसिएशनकडे राहतील. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या तारखांप्रमाणे वयोगटांच्या तारखांमध्ये बदल होईल.
दि. १९ / ०२ / २०२१ रोजी सकाळी १० वाजता श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था मंदिर सभा मंडपामध्ये हजर रहावे. येताना सोबत २ पासपोर्ट साईज फोटो आणावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून करण्यात आले आहे.