कृपाशंकर सिंह भाजपमध्ये दाखल

मुंबई – राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ माजी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

त्यांनी सन 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच कॉंग्रेसमधून राजीनामा दिला होता. आपण भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत त्यांनी खूप आधीच दिले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचाही आरोप आहे. भारतीय जनता पक्षानेच त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*