रत्नागिरी : रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल्वे कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे प्रशासनाच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चासाठी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र येथील कोकण रेल्वे कर्मचारी, तसेच अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले प्रकल्पग्रस्त हेही मोठ्या संख्येने आलेले होते.

अलीकडच्या काळामध्ये कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षा विभागात पॉईंट्समन आणि गेटमन या पदांवरती कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच खाजगी माणसं भरली आहेत. हा प्रवाशांच्या जिविताशी एक प्रकारचा खेळच प्रशासन करत असल्याचा आरोप रेल कामगार सेनेने केला आहे.

त्याचबरोबर ही कॉन्ट्रॅक्ट भरती तातडीने थांबवून आपण त्या ठिकाणी कोकण रेल्वेचे प्रकल्पग्रस्त यांना प्राधान्याने नोकरी द्यावी तसेच कोकण रेल्वे वरती कुठे ही कॉन्ट्रॅक्ट भरती करू नये.

कोकण रेल्वे वरती वाढत्या गाड्या लक्षात घेता रनिंग स्टॉप मध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर यांची पुरेपूर संख्या भरावी. सिनियर गुड्स ट्रेन मॅनेजर ते पॅसेंजर ट्रेन मॅनेजरचा खूप दिवस रखडलेला प्रमोशनचा प्रश्न सोडवावा.

ट्रॅक स्पेशलसाठी जेपिओ तातडीने बनवावा. त्याचबरोबर कोकण रेल्वे, मध्य रेल्वे प्रमाणेच वेगळा झोन बनवून इंडियन रेल्वेमध्ये मर्ज करावी. त्याचबरोबर अशा अन्य मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

रेल्वे प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस ठेवला होता. यावेळी कोकण रेल्वे तर्फे डायरेक्टर फायनान्स राजेश बदंग, तसेच मुख्य कार्मिक अधिकारी अनुराग मेश्राम यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या कॉन्ट्रॅक्ट भरती संदर्भात प्रकल्पग्रस्तांना कशाप्रकारे सामावून घेता येईल याविषयी विस्तृत चर्चा झाली आणि डायरेक्टर फायनान्स यांनी ती मान्य ही केली.

याचबरोबर रेल्वे बोर्डाने मान्य केलेली 190 जागांची प्रॉपर भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्यामध्ये सुद्धा कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना उचित न्याय मिळेल असेही आश्वासन दिले.

आता ठरल्याप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची यादी लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे पोहोचती करून त्यामधूनच तात्पुरत्या तत्त्वावर असणारी कॉन्ट्रॅक्ट लेबरची भरती करावी, असेही अंतिम रित्या ठरले.

या वेळेला भटकळ येथील पॉइंट्समन योगेश नाईक यांनी एका प्रवाशाचे प्राण वाचवले त्याबद्दल त्याचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळेला प्रकल्पग्रस्तांपैकी मुकादम आणि अन्य सहकारी हजर होते. सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी अर्जुन जमखंडीकर, चंद्रकांत विनारकर, सूर्यकांत आंबेकर ,सुरेश परदेशी, भरत शर्मा, राजू पवार, सुनील आगाव, राजेश कोकाटे, त्याचबरोबर कोकण रेल्वेचे राजू सुरती, विलास खेडेकर, विश्वास राणे, कौस्तुभ ढेकणे, मुरगेशन, दत्ता तेलंगे, गजा गायकर, रवींद्र गुजर, प्रमोद नागराज, मिनाज झारी आदींनी मेहनत घेतली