त्याच दिवशी, ०४ जून २०२५ रोजी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना दुसरी गुप्त माहिती मिळाली की, तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून एक २०-२५ वयोगटातील इसम हिरव्या रंगाच्या बॅगेत गांजा घेऊन विक्रीसाठी येत आहे. खेड रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवून पोलिसांनी रवींद्र प्रेमचंद खेरालिया (वय २५, रा. उत्तर प्रदेश; सध्या रा. मुस्कान अपार्टमेंट, टाकी रोड, आंबेडकर नगर, मिरा रोड, ठाणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ किलो २२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८५/२०२५, एनडीपीएस कायदा कलम ८सी, २०बी, २बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली कारवाई: मुंबई-गोवा महामार्गावर गांजा तस्कर जाळ्यात

रत्नागिरी: खेड पोलीस ठाण्याने अमली पदार्थ तस्करीविरोधात सलग तिसरी मोठी कारवाई करत एकाच रात्री दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन गांजा तस्करांना अटक केली आहे. या कारवायांमध्ये एकूण २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपी एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

दिनांक ०४ जून २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना गुप्त माहिती मिळाली की, मुंबईहून एक इसम पांढऱ्या रंगाच्या यामाहा R15 स्पोर्ट्स बाईकवरून मुंबई-गोवा महामार्गावरील शहरांमध्ये गांजा विक्रीसाठी येत आहे. त्यानुसार भरणे नाका, खेड येथे गस्त घालत असताना पोलिसांना कमलेश उर्फ सुजल उर्फ रंजीत विचारे (वय २०, रा. नालासोपारा, वसई, पालघर; सध्या रा. शिवतर दत्तवाडी, खेड, रत्नागिरी) हा संशयित आढळला. त्याच्या ताब्यातून १ किलो ४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच, गुन्ह्यात वापरलेली यामाहा R15 बाईकही जप्त करण्यात आली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८४/२०२५, एनडीपीएस कायदा कलम ८सी, २०बी, २बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई: खेड रेल्वे स्टेशनवर गांजा तस्कर अटकेत

ड्रग कार्टेलचा पर्दाफाश

दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेला एकूण २ किलो ६६ ग्रॅम गांजा आणि अटक केलेले आरोपी कमलेश विचारे आणि रवींद्र खेरालिया हे एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. या ड्रग कार्टेलच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी खेड पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलीस पथकाचे कौतुक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जोगी, सुमित नवघरे, रोहित जोयशी, अजय कडू, राम नागुलवार, वैभव ओहोळ आणि पोलीस हवालदार विक्रम पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी खेड पोलीस ठाण्याच्या या सातत्यपूर्ण कारवायांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.