केजीएफ : २ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या स्टोरीपासून ते रॉकी भाईचे दमदार डायलॉग चाहत्यांना खूप आवडत आहे. एकीकडे हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे या चित्रपटाने आता IMDb (Internet Movie Database) वर इतिहास रचलाआहे. या चित्रपटाला IMDb वर जबरदस्त रेटिंग मिळाले आहे.
या चित्रपटाचे रेटिंग 9.7 आहे. सरासरी 42 हजार मतांच्या आधारेहे रेटिंग घेण्यात आले आहे. डिएनएमधील अहवालानुसार,IMDb वर पहिल्यांदाच या भारतीय चित्रपटाला सर्वोच्च रेटिंगमिळाले आहे. केजीएफ: २ ने जूनियर एनटीआर राम चरण यांच्या ‘RRR’ आणि सूर्याच्या ‘जय भीम’ या चित्रपटाचा पराभव केला आहे.
केजीएफ : २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली होती. तर चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 46.79 कोटी एवढे झाले आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 100.74 कोटींची कमाई केली आहे.
दोन दिवसात कोणत्या चित्रपटाने केली किती कमाई
KGF Chapter 2 – 100.74 crores
Baahubali 2: The Conclusion – 81.45 crores
Thugs Of Hindostan – 79 crores
War – 74.70 crores
Sultan – 73.86 crores
Sanju – 73.35 crores
Bharat – 73.30 crores
Happy New Year – 73.04 crores
Prem Ratan Dhan Payo – 71.40 crores
संजय दत्त मुख्य व्हिलनच्या रोल मध्ये
केजीएफ चॅप्टर-2 मध्ये बॉलिवूड अभिनेता ‘संजय दत्त’ने मुख्य व्हिलनची भूमिका साकारली आहे. ‘अधिरा’ असे या पात्राचे नाव असून, यासाठी संजयने प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संजूबाबाने सडक, खलनायक, वास्तव, साजन ते मुन्नाभाई अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट पात्रे रंगवली.
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये असं दिसून येत की, अधीरा वाट्टेल ते करायला तयार आहे आणि रॉकीशी लढण्यासाठी त्याच्या सैन्याला आदेश देतो. संजयला अधीराच्या भूमिकेत पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. लांब पोनीटेल, लाल डोळे, अंगावर अनेक टॅटू, जड चिलखत या भीतीदायक रुपात संजूबाबा दिसतोय. यामध्ये संजयची संपूर्ण मेहनत आपल्याला दिसून येत. चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना त्याला दररोज 25 किलोचे चिलखत घालून शूटिंग करावे लागले आहे.