कशेडी घाटात लाद्यानी भरलेला टेम्पो उलटला, एक जण ठार ,दाेन जखमी

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात आंबा पॉईंट येथे लाद्यानी भरलेला टेम्पो उलटल्याने टेम्पोच्या हौदात बसलेला बन्सीलाल कुमावत हा कामगार ठार झाला तर मुकेश कुमरा व राजेश कौंडर हे दोन कामगार जखमी झाले आहेत. नांदेड येथील राहणारा सुधाकर भगमोरे हा आयरिश टेम्पोमध्ये लाद्या भरून पनवेल येथून गुहागर येथे येत असता मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आंबा पॉईंट येथे त्याचा टेंम्पोवरील ताबा सुटल्याने वळणावर टेम्पो उलटला टेम्पोच्या हौदात लाद्यांवर बसलेल्या तीन कामगारांपैकी बन्सीलाल कुमावत यांच्या अंगावर लाद्या पडून त्या तो अडकून मयत झाला तर इतर दोन कामगार जखमी झाले याबाबत टेम्पोचालक सुधाकर याच्याविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*