नवी दिल्ली : वृत्तसंस्था- Karnataka High Court | अनेकवेळा दिसून येते की, एखाद्या घटनेतील आरोपींची पोलिस हातकड्या घालून परेड काढतात. मात्र कर्नाटक हायकोर्टाने एक असा आदेश दिला असला आहे जो वाचल्यानंतर पोलिस असे करण्यापूर्वी एकदा नक्कीच विचार करतील. (Karnataka High Court )

पोलिसांनी आरोपीला हातकडी घालून त्याची सार्वजनिकरित्या परेड घेतल्याची गंभीर दखल घेत कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला 2 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्याच वेळी, न्यायालयाने असेही म्हटले की, अटक केलेल्या आरोपीला सामान्यतः हातकडी लावता येत नाही.

पोलिस अधिकाऱ्यांना बॉडी कॅम द्या एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बॉडी कॅमेरे उपलब्ध करून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कर्नाटकच्या डीजीपींना दिले जेणेकरून अशा कॅमेऱ्यांद्वारे अटक करण्याची पद्धत रेकाड केली जाऊ शकते. (Karnataka High Court )

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांनी आपल्या आदेशात सांगितले की, अंडरट्रायल आणि दोषी आरोपींना कधी हातकड्या घातल्या जाऊ शकतात याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

फक्त तातडीच्या परिस्थितीत हातकडी

न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, केवळ अत्यंत अत्यावश्यक परिस्थितीत आरोपीला हातकडी लावली जाऊ शकते. जेव्हा अशावेळी हातकडी घातली जाते तेव्हा अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला हातकडी घालण्याचे कारण नोंदवणे आवश्यक आहे, जे न्यायालयीन चौकशीसाठी ठेवावे लागेल.

…तर पोलिसांवरच होऊ शकते कारवाई

अशा परवानगीसाठी अर्ज न केल्यास आणि विचाराधीन आरोपीला हातकड्या घातल्या गेल्यास, संबंधित पोलिस अधिकाऱ्यावरच कारवाई केली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

परीक्षा देऊन घरी परतणारा कायद्याचा विद्यार्थी सुप्रीत ईश्वर दिवटे यास बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथील बाजारपेठेत पोलिसांनी अटक केली. त्याला हातकडी घालून परेड करून सार्वजनिक बसमधून चिक्कोडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.