रत्नागिरी-कोरोना विरुध्दच्या लढ्यात माध्यम जगताची भूमिका मोठी आहे हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व माध्यम जगतातील पत्रकारांसाठी उद्या 23 मार्च 2021 रोजी विशेष लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. उद्या दुपारी12 नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच तालुक्यांच्या ठिकाणांवर उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हे लसीकरण होईल.यासाठी पत्रकारांनी आपले ओळखपत्र आणि आधार क्रमांक असणारे पत्र सोबत ठेवायचे आहे.  पत्रकारांच्या लसीकरणासाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही.  पत्रकाराच्या कुटूंबात असणाऱ्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सहव्याधी (कोमॉर्बीड) व्यक्तीचेही लसीकरण यावेळी करण्यात येणार आहे सोबतच पत्रकारांच्या कुटूंबातील 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचेही लसीकरण यात होणार आहे. पत्रकारांनी आपापल्या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधावा व उद्या 23 मार्च रोजीच्या लसीकरणात सहभागी व्हावे,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.