दापोली : JCI दापोलीने 17 ऑगस्ट 2025 रोजी JCI मॅरेथॉन सीझन 2 यशस्वीपणे आयोजित केली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसातही सहभागींचा उत्साह आणि JCI सदस्यांचा जोश यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. सुमारे 150 धावपटूंनी विविध गटांमध्ये भाग घेतला.
या कार्यक्रमाला डॉ. संजय भावे (कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), साधना ताई बोत्रे, अतुल मेहता (अध्यक्ष, लायन्स क्लब), आशिष मेहता, श्रीराम माजलेकर, PSI ज्योती चव्हाण, विनोद आवळे आणि मिलिंद शेठ (दापोली तालुका व्यापारी संघटना) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

JCI दापोलीच्या सर्व सदस्यांनी जबाबदाऱ्या पार पाडून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दापोली पोलिसांनी सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि धावपटूंसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित केल्याबद्दल आयोजकांनी विशेष आभार मानले.

🏆 विजेत्यांची यादी 🏆
2K महिला
🥇 समृद्धी संतोष ढडवे
🥈 ऐश्वर्या वसंत खैर
🥉 तनुजा राजेंद्र साबळे
2K पुरुष
🥇 आयुष अशोक बारजे
🥈 सुनील रघुनाथ रेवाळे
🥉 सुजय सुभाष मर्चंडे
5K महिला
🥇 शिल्पा शंकर कांबळे
🥈 कस्तुरी कमलाकर भानशे
🥉 अनुश्री रविकांत अंबेकर
5K पुरुष
🥇 सिद्धेश पांडुरंग बारजे
🥈 ओमकार विष्णू बैकर
🥉 यश मंगेश शिर्के
🎖 सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे, पदके आणि कूपन्स देऊन सन्मानित करण्यात आले.

ही मॅरेथॉन केवळ तंदुरुस्तीसाठी नव्हती, तर “स्वच्छ व हिरवी दापोली, निरोगी दापोली” हा संदेशही घेऊन आली. JCI दापोली आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण जागरूकतेच्या प्रसारासाठी अशा उपक्रमांद्वारे कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया JCI अध्यक्ष फराज़ रखांगे यांनी दिली. यामध्ये सहभागींचा उत्साह प्रेरणादायी होता, तर पावसातही JCI दापोलीच्या सदस्यांनी दाखवलेली मेहनत आणि एकजुटीने सर्वांचे लक्ष वेधले, असंही ते म्हणाले.
JFD डॉ. सुयोग भगवत, JC समीर कदम, IPP JC ऋत्विक बापट, JC भूषण इस्वलकर, JC अभिषेक खटावकर, HGF कुणाल मंडलिक, JC डॉ. पीयूष सोंजे, JC डॉ. कुणाल मेहता, JC स्वप्नील मेहता, JC तेजस मेहता, JC बासित देशमुख, JC फैजान पुरकर, JC रोशन वेदक, JC डॉ. समर्थ पेंढारे, JC प्रसाद दाभोळे, JC मयुरेश शेठ, JC ऋषिकेश शेठ, JC सचिन तरडे, JC भरत रसाळ, JC विकास राठोड, JC महेंद्र खैरे, JC वरुण बोधे, JC खुशाल जैन, JC मुकुल नेने, JC राहुल डाक, JC डॉ. महेंद्र पाटील, JC राहुल राठोड, JC डॉ. स्वप्नील भोजने, JC फराज रखांगे – अध्यक्ष 2025, JC तेजस मेहता – सचिव 2025, JC रोशन वेदक – प्रकल्प अध्यक्ष, JC डॉ. पीयूष सोंजे – प्रकल्प संचालक आणि JC भरत रसाळ – प्रकल्प समन्वयक यांनी मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी विशेष अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जेसी एचजीएफ प्रा. कुणाल मंडलिक आणि जेसी. प्रा. तेजस मेहता यांनी केले.