दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये विविध व वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले असून जेसीआय दापोली व माहेर ग्रुप यांच्याकडून दापोलीतील महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.

या शिबिरामध्ये एकूण ८3 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी आनंद क्लिनिकच्या डॉ. अमृता होन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या शिबिरामध्ये जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक, माहेर ग्रुपच्या कविता मालू, मीनल लिमये, वैष्णवी कदम, निकिता सावंत, अपर्णा जोगळेकर, सोनाली दाभोळे, मनीषा जोशी यांनी शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले आणि विशेष सहभाग नोंदवला.