दापोली: नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दापोली येथील कु. जरियान फारूक आराई याने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७९ किलोग्रॅम वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत स्नैचमध्ये ५० किलोग्रॅम आणि क्लीन अँड जर्कमध्ये ६० किलोग्रॅम असे एकूण ११० किलोग्रॅम वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला.
या दमदार कामगिरीमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि झोनल स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. ही बाब नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
जरियानच्या या यशस्वी कामगिरीला प्रशालेचे क्रीडा शिक्षक अशफाक खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, संस्थेचे सचिव इकबाल परकार आणि प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी जरियानचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.