दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचालित आर आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल दापोली येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

शिक्षकांसोबत मुश्ताक खान, शिवाजी गोरे, यशवंत कांबळे आणि फैसल काझी

दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी शाळेच्या प्रांगणात शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. भक्ती महाडिक, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता गावकर तसेच दापोली पत्रकार संघाचे शिवाजी गोरे, माय कोकण चॅनलचे संपादक व शाळेचे माजी विद्यार्थी मुश्ताक खान, पत्रकार यशवंत कांबळे तसेच वृत्त छायांकनकार फैसल काझी यावेळी उपस्थित होते.

पकार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी वर्ग

या मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शाळेचे शिक्षक राजेंद्र देवकाते यांनी प्रास्ताविक केले यावेळी बोलताना शिवाजी गोरे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली तर मुश्ताक खान यांनी वृत्तपत्र लेखन आणि त्याचबरोबर पत्रकारिता भविष्याच्या दृष्टीकोनातून चांगले पर्याय आहेत याकरता विद्यार्थ्यांनी जरूर प्रयत्न करावेत, असे सांगितले.

मार्गदर्शन करताना संपादक मुश्ताक खान

सर्व पत्रकारांचा यावेळी शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रसन्न चिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी चालू केलेल्या यूट्यूब चैनल बद्दल सर्वांना माहिती दिली. देवकाते सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.