
परिस्थिती पुर्वरत होईपर्यत अविरत रहाणार संस्थांचे काम सुरु
दापोली:- गेले ४८ तासात चिपळुण व महाड परिसरातमध्ये पावसांनी हाहाकार माजविला होता. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर आली आहेत. सर्वात पावसाचा जास्त फटका हा चिपळुण व महाड परिसरामध्ये बसला आहे. अशा संकटाच्या काळात श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे प्रशासनाने सुचवलेल्या भागात अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण व रायगड जिल्ह्यातील महाड येथे संस्थानाचे १०० कार्यकर्ते व रुग्णवाहिका या सेवेत सहभागी झाल्या आहेत. दोन्ही तालुक्यातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महापूर, दुष्काळ, कोरोना अशा काळात संकटाच्या काळात वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे.
काल सकाळपासून येथील पूर ओसरला आहे. घरामधील बऱ्याच लोकांच्या वस्तु वाहुन गेल्याने अन्न शिजवावे अशी परिस्थिती नाही. अशावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मदतीला धावले आहे. तालुका प्रशासनाच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन संस्थानाचे कार्यकर्ते खिचडीची पाकिटे वाटण्यात आली. चिपळूणचे तहसीलदार डॉ. जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नदान करण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या काही लोकांची येथील सती हायस्कूल मध्ये निवाऱ्याची सोय केली आहे. तिथेही ही अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. सती नाका, पिंपळी समर्थनगरे येथेही पकिटे वाटली. सुयोग्य नियोजनाचे कौतुक करित स्थलांतरित नागरिकांनी या उपक्रमाचे समाधान व्यक्त करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत असे वाटप करण्यात आले. संस्थानतर्फे सावर्डे येथे अन्न व पाकिटे तयार करण्यात आली. संस्थानच्या वतीने चालू करण्यात आलेल्या उपक्रमाचे स्थानिक आ. शेखर निकम, तहसीलदार सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी कौतुक केले. वाटपप्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानचे ५० कार्यकर्ते व रुग्णवाहिका या सेवेत कार्यरत आहेत. अविनाश जागुष्टे, सुनील वीर, राजन बोडेकर, सुनिल मोहिले, दिलीप मोहिरे, संतोष बिजीतकर, सिद्धेश रहाटे, आशिष शिवगण, प्रथमेश मोहिरे आदी या मदतकार्यात सहभागी होते.

Leave a Reply