भारताची ताकद पुन्हा वाढणार! US Navy ने Indian Navy ला दिले ‘हे’ विशेष हेलीकॉप्‍टर्स

भारतीय नौदलाच्या ताफ्यात विशेष हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे , ज्यामुळे भारताची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. अमेरिकन नौदलाने दोन MH-60 R रोमियो हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला दिली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर १६ जुलै रोजी सॅनडिएगो येथे झालेल्या कार्यक्रमात अमेरिकेत भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांच्याकडे सोपविण्यात आले. भारताने अमेरिकेतून एकूण २४ हेलिकॉप्टर खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरचा वापर सैन्याच्या वाहतुकीसाठी, मदत आणि बचाव कार्यात आणि शत्रूच्या पाणबुड्यांविरूद्ध लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरची खास गोष्ट म्हणजे हे हेलिकॉप्टर सर्व हंगामात काम करण्यास सक्षम आहेत. देशाला हेलिकॉप्टर मिळण्याविषयी माहिती देताना भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*