रत्नागिरी : भारताने आज अतिशय दमदार खेळ दाखवत न्युझीलँडचा 70 धावांनी सेमी फायनल मध्ये धूवा उडवला. आजच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने बाजी मारून आपली जागा फायनलमध्ये निश्चित केली आहे. आजच्या दिवशी मोहम्मद शमीने सात विकेट घेऊन नवा रेकॉर्ड आपल्या नावी कोरला आहे.
आणखी एक रेकॉर्ड आजच्या मॅचमध्ये झाला तो म्हणजे विराट कोहली यांना आपल्या पन्नासाव्या शतकाची नोंद केली. सचिन तेंडुलकर याच्या रेकॉर्डला मागे टाकत विराटने आज रेकॉर्ड ब्रेक इनिंग खेळली.
आता सर्वांना उत्सुकता आहे उद्याच्या सेमी फायनल मध्ये दक्षिण आफ्रिका बाजी मारते की ऑस्ट्रेलिया. उद्याच्या सेमी फायनलमध्ये जो संघ जिंकेल तो भारताबरोबर 19 तारखेला फायनल खेळेल.
क्रिकेट फिव्हर सध्या संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की, फायनलमध्ये कोण बाजी मारत आहे. पण ज्या हिशोबाने भारताचा फॉर्म आहे या वर्ल्डकपमध्ये भारतच विजय होईल, असा विश्वास क्रीडा समीक्षकांना आणि तज्ज्ञांना आहे.