कोव्हॅक्सिनच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी २०२१ पासून प्रारंभ करण्यात आला होता. अशा वेळी लसींची संख्या आणि उत्पादनासोबतच लसींच्या किंमती कमी केल्या जाऊ शकतील, असा कयास बांधला जात होता. परंतु, तो फोल ठरलाय. केंद्र सरकारकडून कोरोना लसींच्या किंमती वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात जुलै महिन्यापर्यंत फार्मा कंपन्यांनी सरकारसोबत मिळून लसींची किंमत निश्चित केली होती. यानुसार, कोव्हिशिल्डच्या एक डोससाठी २०० रुपये तर कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी २०६ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*