दापोली:- गिम्हवणे ग्रामपंचायत ने सुरु केले्लया कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा उपक्रम या साथीच्या काळात गरजेचा व कौतुकास्पद असुन आपण यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिली. त्याचाच भाग म्हणून ऑक्सीजन कॉन्संट्रेटरच्या दोन मशीन आपण आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. १जुलै रोजी हा कार्यक्रम जि. प. आदर्श केंद्र शाळेत सोशल डिस्टन्स पाळुन घेण्यात आला. दापोली शहराजवळ असलेल्या गिम्हवणे ग्रामपंचायतीच्या कोव्हीड सेंटर चे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते आदर्श केन्द्र शाळा गिम्हवणे येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी शरद पवार,तहसीलदार वैशाली पाटील,तालुकाप्रकुख प्रदिप सुर्वे,गिम्हवणे वणंद ग्रूप ग्रा. पं. च्या सरपंच साक्षी गिम्हवणेकर, उपसरपंच किशोर काटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष मारकड, डॉ.शिंदे,सुनील दळवी गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रा. पं. सर्व सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरपंच साक्षी गिम्हवणेकर यांच्या हस्ते आमदार योगेश कदम व मान्यवरांचा गौरव यावेळी करण्यात आला. आपण आमदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी कोव्हीड साठी दिला आहे. त्यातील ५० लाख रुपये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर आपण मतदारसंघासघासाठी हाँगकाँग वरून मागवल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच साक्षी साळवी यांनी सांगितले की ग्रामस्थांच्या सहकार्याने व ग्रामपंचायत पुढाकाराने हे कोव्हीड सेंटर उभे राहिले आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणून ते लवकर बंद होईल अशी आमची इच्छा व प्रयत्न असतील असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच ग्राम देवस्थान अध्यक्ष शंकर साळवी यांनी केले. हे कोव्हीड सेंटर ३० बेडचे असून ज्यांनी ज्यांनी याआठी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.