मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार

मंडणगड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खेड आगार, रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांच्या जागी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पाच एसटी बसेस आज मंडणगड एसटी आगारात सेवेत दाखल झाल्या.

या नव्या बसेसचे लोकार्पण महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगड आगारात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी परिवहन विभागामार्फत पुढील टप्प्यात कोकणातील खेडोपाडी आणि दुर्गम भागातील प्रवास सुलभ करण्यासाठी मिनी बसेसचा ताफा लवकरच जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

कोकणातील शेवटच्या गावापर्यंत वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी या नव्या बसेसचा ताफा ही केवळ सुरुवात असून, आगामी काळात मिनी बसेसचाही ताफा उपलब्ध होईल, असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे मंडणगड आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार असून, ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळणार आहे.

नव्या बसेसच्या समावेशाने स्थानिक प्रवाशांसाठी अधिक सक्षम, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, सुरेश दळवी, हरिश्चंद्र कोदेरे, इरफान बुरोंडकर, संजय शेडगे, दीपक मालुसरे, आनंद भाटे, विनोद जाधव, चेतन सातोपे, आजी-माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*