रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. ग्राहकांप्रति सहानुभूती दाखवून तडकाफडकी कारवाई नको, म्हणून थकबाकीदारांच्या जोडण्या अजून कंपनीने तोडलेल्या नाहीत. मात्र आता ती वेळ येणार आहे. जिल्ह्यात ५७ कोटीची असलेली थकबाकी आता काही दिवसांमध्ये ५८ कोटी ४६ लाखावर गेली आहे. यामध्ये १ लाख ६७ हजार २७१ ग्राहकांचा समावेश आहे. तर शासकीय थकबाकी १ कोटी ६६ लाख आहे. महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक बनली आहे. राज्यात ही थकबाकी ६० हजार कोटींच्यावर आहे. थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान कंपनीसमोर आहे. कंपनीने थकबाकीदारांना अनेक नोटीसा दिल्या आहेत.