15 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
रत्नागिरी : दिनांक ११/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला काही इसम हातखंबा निवळी गणपतीपुळे रोडने शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थांची बोलेरो चारचाकी वाहनातून वाहतूक करणार आहेत अशी गोपनिय बातमी मिळालेली होती. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी पथक तयार करून त्यांना कारवाई करीता रवाना केले.
त्याप्रमाणे सदर पथक गुरुवार दिनांक ११/०७/२०२४ रोजी १०:१५ वाजता हातखंबा निवळी, गणपतीपुळे अशी पेट्रोलिंग करीत असताना मौजे निवळी तिठा येथे निवळी ते गणपतीपुळे जाणारे रोडचे उजवे बाजुस कच्च्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी उभी असलेली दिसली. सदर गाडीची पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी रत्नागिरी व पंच यांचे समक्ष तपासणी केली असता गाडीचे मागील हौदयामध्ये ८ लाख ०४ हजार ११६/- रूपये किंमतीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ मिळुन आला. त्याप्रमाणे शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखु व चारचाकी वाहन मिळून एकुण १५ लाख २९ हजार ११६/- रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीत (१) संकेत शिवाजी चव्हाण, चय २० वर्षे, रा. फणसोप सडा, फणसोप हायस्कुलजवळ, घर नं.७२९, ता.जि. रत्नागिरी, (२) विशाल बळवंत घोरपडे, वय ३२ वर्षे, रा. खटाव, ता.मिरज, जि. सांगली, सद्या रा.फणसोप सडा, शिवाजी आनंदराव चव्हाण यांचे घरी, ता.जि.रत्नागिरी, (३) सुरज राजू साळुंखे, वय ३३ वर्षे, रा.पुणे धायरी, तानाजीनगर, घर नं.३९. ता. जि.पुणे, सद्या रा.फणसोप सडा, शिवाजी आनंदराव चव्हाण यांचे घरी, ता.जि. रत्नागिरी यांचेकडुन हस्तगत करण्यात आला असुन त्यांचे विरूध्द रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गु. र. नं. ११९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३,२७४, २७५,२२३.३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i),२६ (२) (iv),२७ (३) (d).३०(२) (a).३(१) (zz) (iv), ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या खालील नमुद पथकाने केलेली आहे.
(१) जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक
(२) पोउनि/ आकाश साळुंखे
(३) पोहेकॉ/११८८ सुभाष भागणे
(४) पोहेकॉ/२५१ शांताराम झोरे
(५) पोहेकॉ/७९९ विनोद कदम
(६) पोहेकॉ/३०१ बाळु पालकर
(७) पोहेकॉ/१२३८ प्रविण खांबे
(८) पोहेकॉ/१४०८ योगेश शेट्ये
(९) चापोकों/२१५ अतुल कांबळे