रत्नागिरी : साळवी स्टॉप ते कुवारबाव महामार्गाच्या लगत उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामावर येत्या आठ दिवसांत प्रशासनाचा हातोडा पडणार आहेमहामार्गावर उभ्या झालेल्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले जाणार नाही.

लवकरच या बांधकामांवर कारवाई करून ही बांधकामे पाडली जाणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या ८ दिवसात साळवी स्टॉप ते कुवारबांव दरम्यान उभ्या राहिलेले बांधकाम जेसीबीने पाडून टाका असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

साळवी स्टॉप ते कुवारबांव व साळवीस्टॉप ते चर्मालय या प्रस्तावित मिऱ्या-नागपूर महामार्गावर सध्या अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे.

रातोरात पत्र्याच्या शेड मारून या ठिकाणीबांधकामेदेखील केली जात आहेत. या विरोधात काहीदिवसांपूर्वी रत्नागिरीकरांनी आवाज उठविला. रत्नागिरीचीओळख पुसण्याचा प्रयत्न काही तथाकथित करत असल्याचा आरोपदेखील झाला होता.

आज पत्रकार परिषदेतच हा प्रश्न उपस्थित झाल्यावर सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले त्यावेळी अधिकार्यांनी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून येत्या आठ दिवसाच्या आत पोलीस बंदोबस्तात ही बांधकामे काढली जातील असे सांगितले.