सध्याच्या स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्ड राहतील अशी सोय आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिमकार्ड असतात. सध्याच्या स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्ड राहतील अशी सोय आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिमकार्ड असतात. मात्र आता दूरसंचार विभागाने (DoT) नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या लोकांचे कनेक्शन तोडण्याचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार, नऊ पेक्षा जास्त सिम असल्यास, सिमकार्डची पडताळणी आणि पडताळणी न झाल्यास तुमचा एक क्रमांक वगळता इतर सर्व क्रमांक बंद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भागात राहणाऱ्या लोकांसाठी सहा सिमकार्डची मर्यादा देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त ठेवल्यास पुन्हा पडताळणी करावी लागेल.
सरकारच्या आदेशानुसार एक नंबर निवडण्याची परवानगी दिली जाईल आणि इतर नंबर असलेले सिमकार्ड बंद केले जातील. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना डेटाबेसमधून वापरात नसलेली सर्व फ्लॅग केलेले मोबाइल कनेक्शन बंद करण्यास सांगितले आहे. आर्थिक गुन्हे, विचित्र कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि ईशान्येकडील राज्यात सहा आणि अन्य ठिकाणी नऊ पेक्षा अधिक सिमकार्ड असल्यास पडताळणी करावी लागेल. अन्यथा तुमच्या सिमवरील आउटगोइंग आणि डेटा सेवा ३० दिवसांच्या आत बंद केला जाईल. त्याचबरोबर ४५ दिवसांच्या आत येणाऱ्या इतर सेवाही बंद केल्या जातील. जर एखादा सदस्य पडताळणीसाठी आला नाही, तर नंबर ६० दिवसांच्या आत निष्क्रिय केला जाईल, ज्याची गणना ७ डिसेंबरपासून केली जाईल.
तुमच्याकडे यापेक्षा जास्त सिमकार्ड असतील तर बंद होणार सेवा; सरकारने स्पष्ट केलं की, जर सुरक्षा एजन्सींनी एखादा नंबर चिन्हांकित केला असेल तर त्यावरील आउटगोइंग सुविधा ५ दिवसांच्या आत बंद केल्या जातील. १० दिवसांच्या आत येणारे आणि १५ दिवसांच्या आत पूर्णपणे डिस्कनेक्ट केले जातील.