महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. याविषयी लोकांच्या मनात असलेला संशय कोणत्याही परिस्थितीत दूर करायला हवा आणि त्याची जबाबदारी शासनाचीच आहे, असे स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरातील नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी तटकरे हे शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी तटकरे म्हणाले, आपल्या माहितीनुसार अतिवृष्टी, भरतीचे पाणी व कोयना अवजल या तीन कारणांमुळे पूर परिस्थिती निर्माण झालीकोयना अवजलविषयी वेगवेगळी माहिती पुढे येत असेल तर लोकांच्या मनात संशय असता कामा नये. त्याची चौकशी केली जाईल.