रत्नागिरीसह जिल्ह्यातील इतर नगर परिषद व एका नगरपंचायतीची मुदत संपत असून त्याठिकाणी निवडणूक होणार आहे . रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक डिसेंबरला होईल असा अंदाज आहे . रत्नागिरीबरोबरच राजापूर, खेड, चिपळूण व दापोली नगरपंचायतीची निवडणूक अपेक्षित आहे . मात्र असे असले तरी निवडणुका तारखा जाहीर होऊन त्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे . मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही हा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळेत जर निवडणुका झाल्या नाहीत तर या नगरपरिषदांवर प्रशासक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे . रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यानी देखील जिल्हाप्रशासनाकडे अर्ज करून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती .