सरकार टिकवणे तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. शिवसेनेकडचे मंत्रिपद काँग्रेसला सोडून त्याऐवजी विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देणे म्हणजे सरकार टिकवण्याची जबाबदारी शिवसेनेवर येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची तयारी आहे, असं वक्तव्य गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. विधानसभा अध्यक्षपद मला मिळावं, ही तिन्ही पक्षांची इच्छा आहे. यावर तिन्ही पक्षाचं एकमत झालं आहे, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन विधानसभेचं अध्यक्षपद घेऊ नका, असा सल्ला भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहेशिवसेनेकडेच वनखातं ठेवून विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर स्वीकारावं. कारण शिवसेनेकडे महत्वाची खाती नाहीत. त्यामुळे वनखातं देऊन अध्यक्षपद घेऊ नये, असा सल्ला भास्कर जाधव यांनी दिला आहे.