मजिद चिकटे यांचा I am sorry सिनेमा लवकरच आपल्या भेटीला
दापोली : तुम्ही पाहिले असेल बरेच कलाकार व दिग्दर्शक सिनेक्षेत्रात येण्यासाठी आणि आपली ओळख जगभरात पोहचवण्यासाठी संघर्ष करत असतात. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील उन्हवरे गावचे सुपूत्र निर्माता मजिद चिकटे यांना या क्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाली. मुळात ते या क्षेत्रात नवीनच आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती, बिल्डर व सामाजिक कार्य आहे. असे कार्य करत असताना उन्हवरे गावचे सुपूत्र आणि या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता/ कलाकार रविंद्र जाधव हे त्यांना एका सिनेमाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी दापोली येथे घेऊन गेले. आणि एक नवीन संकल्पना उदयास आली ती म्हणजे “I AM SORRY”.
या चित्रपटाचे कथा, दिग्दर्शक आणि संकलन दिपक भागवत व प्रोडक्शन, कास्टिंग व कॉस्टुम डिझायनर चैत्राली डोंगरे आणि प्रोडक्शन सुपरवायझर किसन चव्हाण तसेच संपूर्ण टीम यांनी मिळून ही संकल्पना एका उंचीवर नेऊन पोहचवली आणि एका सुंदर चित्रपटाची निर्मिती झाली.
यात नॅशनल, इंटरनॅशनल तंत्रज्ञ घेऊन चित्रपट निर्मित झाला. हे सर्व करीत असताना अनंत अडचणी आल्या कोव्हिड, लॉकडाऊन असे असताना मजिद चिकटे अगदी खंबीरपणे सर्व टीमच्या मागे सोबत उभे राहून चित्रपटाची निर्मिती केली.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत रियाझ मुलानी आणि मयुरी कापडने आहेत. सहकलाकार अनुराग शर्मा, नेहा तिवारी, सुषमा सिनलकर, राजेश ताम्हाणे, समिरा गुजर, कौस्तुभ पाद्ध्ये, श्रीकांत कामत, राजेश लाटकर, भग्रे गुरूजी, अस्मिता खटखटे, स्वाती पानसरे व बालकलाकार ओमकार जाधव हे आहेत. सिनेमाचे संगीत दिग्दर्शक सॅम ए. आर. आहेत व गायक जावेद अली व आनंदी जोशी आहेत.
सिनेमाचे कथा पटकथा, दिग्दर्शन व गाणी ही अप्रतिम झाली आहेत. एक वेगळी लव्हस्टोरी लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.