दापोलीत शिकाऱ्याचीच शिकार; अपघात की घातपात? चौकशी सुरू

दापोली – तालुक्यातील साकुर्डे येथील एका तरूणाचा बंदुकीची गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.

साकुर्डे गणेशनगर (जंगमवाडी) येथील विनोद मनोहर बैकर (३३) हा तरूण बुधवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी गावाजवळ असणाऱ्या रहाटीमध्ये शिकारीसाठी गेला होता.

जाताना त्याने जवळच्या वाडीतील तरूणाला शिकारीसाठी येतोय का? असे विचारले होते. मात्र मला घरी काम असल्याचे सांगून त्याने जाण्यास असमर्थता दाखविली होती. नाईलाजास्तव तो एकटाच गेला होता.

सकाळी साडेअकराच्या सुमारास रहाटीमधून बंदुकीचा आवाज आला. विनोदने शिकार केली म्हणून काम करीत असलेला तरूण रहाटीकडे धावला.

रहाटीमध्ये गेल्यावर विनोद कुठेच दिसेना म्हणून तो विनोदला हाका मारू लागला. मात्र विनोद काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याने शोधाशोध केली असता विनोद एका दगडाजवळ त्याला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. विनोद याच्या बेंबीच्या खालील भागास त्याच्याच बंदुकीची गोळी लागल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*