दापोली : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाच्या ‘निसर्गमित्र’ गटाने कोशिंबळे या गावात भाताच्या रोपांना लागवडी करिता ‘बायोला’ जैविक खत याबद्दल माहिती सांगण्यात आली.
हे प्रात्यक्षिक बापू बक्कम यांच्या भातशेती वर करण्यात आले. या संमिश्र खताचा 30 मिनिटे बुडवून त्यानंतर लागवड करण्यात आली. ( प्रमाण : 1 लिटर पाण्यात 25 मिली ). याला शेतकर्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
वरील कार्यक्रमाचे आयोजन जीवन गोडसे, सौरभ शेडगे, सुमेध वाकळे, अनिश जगताप, आकाश जाधव, अनिकेत काजरेकर, लक्ष्मण माळगी, वैभव फुलसुंदर, पार्थ गुरसळे, प्रतीक चव्हाण, रिषभ मोरे यांनी केले.
यासाठी केंद्रप्रमुख डॉ. मनोज तलाठी, ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी जीवन आरेकर, विषय तज्ञ डॉ. राजेंद्र भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.