जिल्ह्यात ‘होम डिलिव्हरी’ला परवानगी

होम डिलिव्हरी ला परवानगी

रत्नागिरी दिनांक 4 July

जिल्ह्यात आठ जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे तथापि घरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरीनिमित्ताने एकटे रहावे लागणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये यासाठी लॉकडाऊन डाऊन आदेशामध्ये फेरबदल करून आदेशातील परिशिष्ट ब मध्ये काही बदल करण्यात येत आहे यानुसार हॉटेल मधून देण्यात येणारी पार्सल सुविधेसाठी मान्यता देण्यात आली आहे या सर्व व्यावसायिकांना covid-19 अंतर्गत सर्व नियमांचे पालन करून ही सुविधा घरपोच पद्धतीने देता येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*