होळी आणि धुलिवंदन;. राज्य सरकारची नियमावली जारी..

राज्यात दरवर्षी होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह दरवर्षी पाहायला मिळत असतो. यंदा उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करणे बंधनकारक असेल. रात्री 10 च्या आत होळी करण्यात यावी. होळी सणाच्या वेळी मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. जर कोणी डी.जेचा वापर करताना आढळल्यास त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मद्यपान करून विभत्स व उद्धट वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी. जमा होणाऱ्या महिलांची व मुलींच कोणीही छेड काढणार नाही. याबाबत मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे. सर्वस्वी जबाबदारी त्यांची असणार आहे. सणानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर वाजवून परीक्षार्थींना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

महिलांनी परिधान केलेले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देण्यात येऊ नये. तसेच आक्षेपार्ह फलक बॅनर लावण्यात येऊ नये.

वृक्षतोड करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही जबरदस्ती रंग, फुगे व पाण्याच्या पिशव्या कोणाच्याही अंगावर फेकू नये. कोठेही आगी लागतील असे कृत्य करू नये.

उद्या आणि परवा होणाऱ्या होळी आणि धुलिवंदनाचा उत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या गृह विभागाकडून वरील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*