रत्नागिरी : पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतात त्याचा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलिय कंपन्यांनी जारी केलेल्या किंमतींनुसार आज पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी तर डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी १०९.५४ रुपये मोजावे लागत आहेत तर एक लिटर डिझेलसाठी ९९.९२ रुपये मोजावे लागत आहेत.

देशातील इतर प्रमुख राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती किती आहेत जाणून घ्या.

दिल्ली

पेट्रोल – १०३.५४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९१.७७ रुपये प्रति लीटर

कोलकत्ता

पेट्रोल – १०४.२३ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९५.२३ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०१.०१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९६ रुपये प्रति लीटर

१८ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात बुधवारी आणि सोमवारी पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. गेल्या ११ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत २.३५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती ३.५० रुपयांनी वाढल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती वाढ झाल्याने गुरुवारी ब्रेंट क्रूड ०.४५ डॉलरने वाढले आहेत. त्याचप्रमाणे डब्ल्यूटीआई क्रूड ही ०.५७ डॉलरने वाढून ७८.८७ डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमती दररोज सकाळी सहा वाजता बदलल्या जातात. सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती लागू केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनांचे दर वाढल्यास पेट्रोल डिझेलच्या किंमतीतही वाढ होते. पेट्रोल डिझेलच्या किंमती SMS च्या माध्यमातूनही जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या बेवसाईटवरुन RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाईप करुन ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवल्यास दररोज पेट्रोल डिझेलच्या किंमती एका SMS द्वारे आपल्याला कळू शकतात. त्याचप्रमाणे BPCL ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

नागरिक/छोटे व्यापारी बेजार

पेट्रोल डिझेलच्या चढ्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं अवघड बनलं आहे. छोटी मोठी नोकरी करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला चाट पडत आहे. गृहिणींचं बजेट कोलमडत चाललं आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. पण निर्दयपणे पेट्रोलियम पदार्थांचे दर सरकार वाढवतच आहे. यामुळे आता नाराजी पसरत चालली आहे.