अवघ्या 18 दिवसात 20% वार्षिक सरासरी पाऊस


रत्नागिरी :  जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या 20 टक्के पाऊस अवघ्या 18 दिवसात पडला आहे. गेल्या 24 तासात सरासरी 112.78  मिमी तर एकूण 1015  मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद राजापूर तालुक्यात 190 मिमी झाली आहे. जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी 3355 मि.मी. आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासातपडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 74, मिमी, दापोली 130, खेड 70 मिमी, गुहागर 88 मिमी, चिपळूण 73 मिमी, संगमेश्वर 105, रत्नागिरी 139, लांजा 146 मिमी, राजापूर 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

दापोली तालुक्यात मंडणगड दापोली येथे पिसई गावाजवळ झाड पडल्याने वाहतूक बंद झाली होती.  सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

संगमेश्वर तालुक्यात मौजे देवरुख येथील श्रीमती रेशमा विष्णू करंडे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 20 हजार रुपये नुकसान झाले जिवीत हानी नाही.  मौजे मुचरी महादेव मोरे व केशव मोरे यांच्या घराचे पावसामुळे पूर्णत: 3 लाख 72 हजार 25 झाले आहे. जीवित हानी नाही.  मौजे बेलारी येथील आदर्श माध्यमिक शिक्षा मंदिर शाळेची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने अंशत: 35 हजार रुपये नुकसान झाले आहे.  मौजे माखजन येथील शरद पोंक्षे यांच्या घराजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने अंशत: नुकसान झाले जिवीत हानी नाही.  मौजे मावळंगे येथे किरण दामू ओगले यांच्या घराजवळील संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याने अंशत: नुकसान जिवीत हानी नाही.

रत्नागिरी तालुक्यात मौजे पंडयेवाडी येथे रस्त्यावर शिळ धरणाच्या पाईप लाईनकरीता रस्त्याच्या दोन मोऱ्या काढल्याने भगवती मंदिर जवळ पाणी तुंबले.

राजापूर तालुक्यात मौजे बेदंखळे येथील सदू गणू म्हादे यांचा गोठा पावसामुळे पडल्याने दोन बैल जखमी झाले आहेत.  सुहास धोंडू म्हादे यांच्या गोठ्याचे पावसामुळे अंशत: नुकसान जिवीत हानी नाही.  मौजे कोदवली येथे 16 जून 2020 रोजी महाकाली देवस्थानाजवळ दरड कोसळली होती परंतु जिवीत हानी नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*