हर्णे बंदराचा होणार कायापालट : बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मुंबई येथील त्यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, नियोजन अधिकारी बढीए तसेच मच्छीमार संघटनेचे सोमनाथ पावशे, हेमंत चोगले, बाळकृष्ण पावशे, दत्ताराम पेढेकर, पीएन चोगले, काशिनाथ पावशे, गोपीचंद चोगले आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*