रत्नागिरी : मुकुल माधव फाऊंडेशन आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सेरेब्रल पाल्सी या लहान मुलांच्या आजाराबाबत जागरूकता आणि मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. 



या कार्यक्रमात पुण्यातील संचिती हॉस्पिटलचे बालरोग हाडवैद्य डॉ. संदीप पटवर्धन, न्यूरो डेव्हलपमेंट तज्ज्ञ डॉ. लीना श्रीवास्तव आणि न्यूरोफिजिओथेरेपिस्ट सलोनी राजे यांनी सेरेब्रल पाल्सीच्या निदान आणि उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, मुकुल माधव फाऊंडेशनचे डॉ. अनुप करमरकर, अभिजीत साळवी, बबलू मोकळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शाहीन पावसकर तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

सेरेब्रल पाल्सी (सीपी) हा मेंदूच्या विकासादरम्यान किंवा गर्भावस्थेत मेंदूला झालेल्या नुकसानामुळे होणारा न्यूरोलॉजिकल आजार आहे.

याची मुख्य लक्षणे म्हणजे स्नायूंची ताठरता, सैलपणा, असंतुलन, अनैच्छिक हालचाली, बोलणे, गिळणे, खाणे, झोपणे किंवा डोळ्यांचे नियंत्रण यामध्ये अडचणी, काही प्रकरणांमध्ये झटके आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील आढळतात.

हा आजार लहान वयातच दिसून येतो आणि त्याची तीव्रता व्यक्तीनुसार बदलू शकते. वेळीच निदान आणि थेरपीद्वारे या आजाराची तीव्रता कमी करता येते, असे तज्ज्ञांनी सांगितले. 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील डिईआयसी (DEIC – District Early Intervention Centre) विभागात ० ते ६ वयोगटातील मुलांच्या जन्मजात आजारांचे वेळीच निदान करून शस्त्रक्रिया किंवा थेरपीद्वारे उपचार केले जातात.

यासाठी पालकांचे समुपदेशनही केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील गरजूंनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन Jonah Hill यांनी केले.