रत्नागिरी दि. १३ : राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अॅड. अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार 13 डिसेंबर 2021 रोजी रात्रौ 11.17 वाजता दादर रेल्वे स्टेशन, मुंबई येथे आगमन व 10111 कोकणकन्या एक्सप्रेसने खेडकडे प्रयाण.

मंगळवार 14 डिसेंबर 2021 रोजी पहाटे 03.00 वाजता खेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह, खेड कडे प्रयाण.पहाटे 03.15 वाजता शासकीय विश्रामगृह, खेड येथे आगमन व राखीव.– राखीव (ता. मंडणगड / दापोली).

मंगळवार 14 डिसेंबर 2021 रोजी राखीव (ता. मंडणगड / दापोली). दापोली येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

बुधवार 15 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी जिल्हा परिषद वार्षिक स्नेहसंमेलन 2021 या कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : जिल्हा परिषद कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 02.20 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून मांडवी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण किंवा सांयकाळी 06.15 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.