दापोली – दाभोळ रस्त्यावर हाणामारी; एक जण गंभीर जखमी

दापोली – दापोली दाभोळ मार्गावर भवानी स्टील या दुकानासमोर बांधकामाला वाळू टाकण्याच्या वादाचे पर्यवसन हाणामारी मध्ये झाले.जखमीना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाळू टाकण्याच्या वादातून दापोलीतील दोन भावांना बेदम मारहाण केल्याची घटना काल दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.०० वा च्या सुमारास घडली यातील एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी ६ संशयितावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दापोली काळकाई कोंड येथील विशाल चौगुले याने नरेंद्र कावळे रा. नवी मुंबई यांच्या दापोली शहरात रूपनगर येथे सुरू असलेल्या बांधकामावर वाळू आपल्या वाहनातून टाकली होती याचा राग येऊन दापोली नावनगर येथील मिथुन कुऱ्हाडे याने आपले भाऊ सुरज कुऱ्हाडे, सुशांत कुऱ्हाडे, हरीचंद्र नलावडे व अन्य दोन अनोळखी व्यक्तीला घेऊन विशाल चौगुले व विलास चौगुले याना शहरातील भवानी स्टील या ठिकाणी गाठून जबर मारहाण केली यात विलास गंभीर जखमी झाला.

दरम्यान वरील ६ संशयितांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*