रत्नागिरी : गणराज तायक्वांडो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप, गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरी येथे २९ जून २०२५ रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा आणि क्लबच्या सचिव तसेच प्रमुख प्रशिक्षक सौ. रंजना मोडूळा यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा यशस्वीपणे संपन्न झाली.

यशस्वी खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:

  • येलो बेल्ट: विधी विवेककुमार दुबे, अहद नवीद वस्ता
  • ग्रीन बेल्ट: निरज प्रशांत मकवाना, आहाना आशिष रसाळ, आध्या आशिष रसाळ
  • ब्ल्यू बेल्ट: जैनब वसिम काझी, तीर्था प्रशांत मकवाना
  • रेड बेल्ट: अनया अभिज्ञ वणजू, समर्थ सुशांत विचारे, अथर्व आत्माराम मुरकुटे

या यशस्वी खेळाडूंना तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, गणराज क्लबच्या अध्यक्ष वकील पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूळा, सदस्य सौ. स्नेहा मोरे, परेश मोंडूळा, शलका जावकर, तसेच पालकवर्ग यांनी शुभेच्छा दिल्या. याशिवाय, टेक्निकल प्रमुख परेश मोडूळा, सिनियर खेळाडू डॉ. मयुरेश नडगिरी, आदिती शिवगण, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, साहिल शिवगण, स्वानंद तुपे, अखिलेश वायंगणकर यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.