राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि.२ मार्च रोजीची गणपतीपुळे येथील अंगारकी संकष्टी निमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आली. मंदिरही दर्शनसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच डॉ.विवेक भिड़े यांनी सांगितले. दीड वर्षांनी अंगारकी संकष्टी येत असून भविकांना गणपती बाप्पाचं दर्शन घेता येणार नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
अंगारकी संकष्टीला गणपतीपुळ्यात यात्रा भरते. या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. कोरोना वाढता प्रभाव लक्षात घेऊन यंदाची गणपतीपुळ्यातील यात्रा रद्द करण्यात आली होती. मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व भविकांनी देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहन डॉ.विवेक भिडे यांनी केले आहे.