दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, साखळोली नं. १ येथे महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कु. कुणाल मोगरे आणि जिया घाणेकर यांच्या हस्ते गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक सुरेश पाटील यांनी गांधीजींच्या एकादश व्रतांचे जीवनात कसे महत्त्व आहे, याबाबत माहिती दिली. तसेच शिक्षिका संगिता लोहारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला शिक्षक समीर ठसाळ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. जिया किरण शिगवण हिने स्वागत आणि आभार प्रदर्शन केले.