गिम्हवणे (दापोली): श्री गजानन महाराज भक्त मंडळ, गिम्हवणे यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार, दि. २० फेब्रुवारी २०२५ (माघ वद्य सप्तमी, शके १९४५) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच, १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या काळात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.



कार्यक्रमाची रूपरेषाः

रविवार, १६ फेब्रुवारी २०२५:

सकाळी १० ते १२: श्रींच्या मूर्तीवर ऊसाच्या रसाचा अभिषेक
दुपारी ३ ते ४: महिला शाहीर बिनता जोशी, पुणे यांचे पोवाडा सादरीकरण
दुपारी ४ ते ५: श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, दापोली यांची भजने
सायंकाळी ४ ते ६: विद्यार्थ्यांच्या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ
सायंकाळी ६: आरती
सायंकाळी ५.३० ते ७.२०: विद्या भारती भजनी मंडळ, श्रीमती रेवाळे यांचे भजन

सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५:

सकाळी १० ते १२: श्रींच्या मूर्तीवर नारळपाणी अभिषेक
दुपारी ४ ते ५: श्री लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळ, जालगांव यांची भजने
दुपारी ५ ते ६: श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ, जालगाव यांची भजने
सायं ५.३० ते ७.३०: श्री गुरुप्रसाद भजनी मंडळ, निमसुती यांचे भजन

मंगळवार, १८ फेब्रुवारी २०२५:

सकाळी ८ ते ९.३०: श्रध्दाचा अभिषेक
सकाळी ९.२०: श्री सत्यगजानन महापूजा
दुपारी ४.०० ते ५.००: श्री म.पी.आय भजनी मंडळ, पांढरेवाडी यांची भजने
सायं. ५ ते ६ः श्री विद्याधर शास्त्री करंदीकर, आंजर्ले यांचे प्रवचन
सायं. ५.३० ते ७.३०: श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ, जालनांव यांची भजने

बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५:
सकाळी ५.३० ते ७: काकड आरती, पंचामृती पूजा, अभिषेक
सकाळी ७ ते ८: नामजप
सकाळी ८ ते ९: अक्षत अभिषेक
सकाळी ९ ते ३ः श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण
सायं. ५ नंतरः आरती

गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ (प्रकटदिन):

सकाळी ५.३० ते १०: काकड आरती, अभिषेक व लघुरुद्र आणि पालखी पादुका प्राणप्रतिष्ठापना

सकाळी १० ते १२.३०: ह.भ.प. श्री. विजय निजसुरे, आंजर्ले यांचे सुश्राव्य कीर्तन

दुपारी १२.३० पासूनः महाप्रसाद (झुणका भाकर)

दुपारी २ ते ५: संगीत सेवा

दुपारी ४ ते ५: वारकरी संगीत सेवा

सायं. ५ ते ७.००: श्रींची पालखी मिरवणूक, ॐ आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ

सायं. ५ ते ५.४५: मंत्रजागर

सायं. ६ ते ७: श्री गहालक्ष्मी भजनी मंडळ, ब्राह्मणवाडी श्री. रमेश कडूरात्री ९ ते १०: हरिपाठ

रात्री ९ ते १०: हरिपाठ

रात्री १०.००: प्रकटदिन समारोप आरती

विशेष आकर्षणः

  • गुरुवर्य ह.भ.प. श्री. पांडुरंग बुवा रेवाळे यांची प्रमुख उपस्थिती
  • ॐ आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ, लि. चा सहभाग
  • संगीत सेवेत सहभागी होण्याची संधी (नाव नोंदणी १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत)
  • महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळातर्फे बसस्टैंड तरीच जालगांव ते श्री गजानन महाराज मंदिर बससेवा
  • विविध ठिकाणी पीठ उपलब्ध (१) स्वानंद स्वीटस्, दापोली (२) मुसलोणकर गुरुजी, जालगांव (३) अजय शिवणेकर

श्री गजानन महाराज भक्त मंडळ, गिम्हवणे यांनी या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.