प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दापोली शहरातील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘फन फेअर’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार,कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, मुनाफ वाडकर,माय कोकण चे शमशाद खान,एम.ई.एस महिला महाविद्यालयाचे प्राचार्य शहाबाज देशमुख, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समिती,सखी सावित्री समिती, शाळा विकास समिती चे अध्यक्ष ,पालक व शिक्षकांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.


‘फन फेअर’ मध्ये खवय्या करिता एकूण पन्नास स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यार्थी व विद्यार्थिनींची वेगवेगळी दुकाने ही उभारण्यात आली होती. अगदी अल्प किमतीमध्ये खाद्यपदार्थ व पेय उपलब्ध होते.यामध्ये मिल्क ज्यूस,मंचुरियन,कोल्ड्रिंक,मिनी पिझ्झा, नेस्ट,चिकन समोसा, मोजिटो,व्हेज सँडविच,कबाब,कटलेट पाव ,चायनीज भेल,रगडा,चिकन रोल, चिकन चीज,फिंगर रगडा कोन,कोल्ड कॉफी ,चिकन टिक्का अशा एकूण पन्नास प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने ही उभारण्यात आली होती. मुलांना खाऊन मस्त मनसोक्त धमाल करता यावी याकरिता कॉर्नवॉल गेम ची दुकाने लावण्यात आली होती.यामध्ये डार्ट,पास द बॉल, थ्रू द ग्लास, थ्रो द रींग,मेमोरी गेम,कलेक्ट द रबर, स्पून अँड बॉल,अशा एकूण चोवीस खेळण्याचे स्टॉल उभारण्यात आले होते. मुलांनी खाण्याचा स्वाद घेत मनसोक्त खेळण्याची मजा ही लुटली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे खाण्याच्या व खेळण्याच्या स्टॉलमध्ये सहभाग नोंदवला. पालकांचाही उत्साह भरभरून होता. आपल्या पाल्याची विक्रीची कला पाहून ते भारावून गेले.
‘फन फेअर’ यशस्वी करण्यास मुख्याध्यापक अय्युब मुल्ला सह कला विभाग प्रमुख प्रा.जमीर जमादार,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.रवींद्र कदम, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.अस्मिता कानाडे,हायस्कूलचे विभाग प्रमुख फैरोजा सावंत, रियाज म्हैशाळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख सलमान मोमीन सह सर्व कॉलेज व हायस्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.